
सरकारी मालकीच्या जमिनीचा सातबारा असणाऱ्या उताऱ्यावरील इतर हक्क, कुळ वहिवाट, वतन तसेच आकारी पड जमिनींचे जुने उतारे शोधून कुलमुखत्यारपत्र घेऊन जमीन व्यवहार करणाऱ्या टोळ्या जिह्यामध्ये कार्यरत आहेत.
पार्थ अजित पवार यांच्या अमेडिया कंपनीची कोरेगाव पार्क मुंढवा येथील 40 एकर जमीन बोपोडी आणि ताथवडेमधील कृषी आणि पशुसंवर्धन खात्याच्या जमीन घोट्याळ्यांचे प्रकार पुढे आले. त्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील शासकीय जमिनींच्या खरेदी-विक्रीचे दस्त आल्यास ते दुय्यम निबंधकांनी नाकारावेत, असे आदेश मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र दुसरीकडे काही नोटरी हे सरकारी जमिनींचे व्यवहार करून देण्यासाठी कुलमुखत्यारपत्र नोटराईज करून देत आहेत.

























































