
आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी व्याघ्र प्रकल्पातील मार्गदर्शक जेम्स भुतिया यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जेम्स भुतिया यांच्या गाणे वाजवण्याच्या टॅलेंटने सगळ्यांनाच थक्क करून सोडले आहे. त्यांनी कोणत्याही वाद्याची मदत न घेता पानांच्या सहाय्याने गाण्याची धून वाजवून दाखवली आहे. तसेच अनोखे टॅलेंट इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयएफएस अधिकाऱ्यांनी भुतिया यांचा व्हिडीओ शूट केला आणि गाणे ओळखा असे नेटकऱ्यांना आवर्जून सांगितले आहे. ‘पानांचा वापर करून गाणे’ सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @ParveenKaswan या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून हे गाणे ‘हरे रामा हरे पृष्णा’ चित्रपटातील ‘कांची रे कांची रे’ असल्याचे सांगतात.





























































