
दिल्ली कार स्फोट प्रकरणात तपास यंत्रणांना आणखी एक महत्त्वाचा पुरावा सापडला आहे. या स्फोटातील मुख्य आरोपी आणि जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी डॉ. उमर याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण प्रकरण आणखी गंभीर झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा व्हिडिओ उमरने स्वतः स्फोटापूर्वी रेकॉर्ड केला होता. तपास पथकाचा असा विश्वास आहे की हा व्हिडिओ उमरच्या कट्टरपंथी विचारसरणीला प्रतिबिंबिंत करतो.
दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एक अटक, NIAने दहशतवादी उमरच्या आणखी एका साथीदाराला ठोकल्या बेड्या
या व्हिडिओमध्ये उमर म्हणतो, “आत्मघाती हल्ल्यामध्ये एखादा व्यक्ती कुठल्या वेळी, कुठे मरायचे आहे यामुळे तो फार खतरनाक मानसिकतेमध्ये गेलेला असतो. तो स्वतःला अशा परिस्थितीमध्ये ठेवतो, जिथे केवळ मृत्यू हाच एकमेव मार्ग आहे. वास्तव असे आहे की, असा विचार किंवा अशी परिस्थिती कोणत्याही लोकशाही आणि मानवी व्यवस्थेत स्वीकारली जाऊ शकत नाही, कारण ती जीवन, समाज आणि कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध आहे.”
Delhi Blast News : दिल्लीत स्फोटाच्या ठिकाणी आढळले तीन काडतूस, टेरर फंडिंगचाही शोध सुरू
तपासादरम्यान उमरच्या आईने उघड केले की, त्यांना त्यांचा मुलगा कट्टरपंथी बनल्याचा बराच काळ संशय होता. तो काही दिवसांपासून कुटुंबाशी संपर्कात नव्हता. स्फोटाच्या काही काळापूर्वी, त्याने त्याच्या कुटुंबाला त्याला फोन करू नका असे स्पष्टपणे सांगितले होते. तरीही कुटुंबाने उमरच्या बदलत्या वागण्याबद्दल पोलिसांना कधीही माहिती दिली नाही.



























































