
जुने वाहन चालवणाऱया वाहनचालकांना पेंद्र सरकारने जोरदार झटका दिला आहे. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेने (एमओआरटीएच) संपूर्ण देशभरातील वाहन फिटनेसच्या फीमध्ये दहापट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर केंद्रीय मोटर वाहन नियम (पाचवी सुधारणा) अंतर्गत लागू करण्यात आले आहेत. या नव्या बदलानुसार, सरकारने फिटनेस फीच्या उच्च श्रेणीसाठी गाडीचे आयुष्य कमी केले आहे.
याआधी 15 वर्षे जुन्या गाडीवर सरकारकडून मोठी फी आकारली जात होती, परंतु आता सरकारने ही वयोमर्यादा कमी केली असून केवळ 10 वर्षे पूर्ण करणारे वाहन फिटनेस फीच्या पॅटेगरीत येणार आहेत. संपूर्ण देशभरातील मोटर्स वाहन नियमांमध्ये बदल करण्यात आला असून याअंतर्गत फिटनेस फीला तीन टप्प्यांत विभागले आहे. यात पहिली पॅटेगरी 10 ते 15 वर्षे, दुसरी कॅटेगरी 15 ते 20 वर्षे आणि तिसरी पॅटेगरी 20 वर्षांपेक्षा जुन्या गाडय़ांचा समावेश आहे. आता जसजशी गाडी जुनी होईल तसतशी त्या वाहनाची फी वाढत जाईल. याआधी 15 वर्षे जुन्या गाडय़ांसाठी फी एकसमान होती, परंतु आता प्रत्येक कॅटेगरीत वेगवेगळी फी भरावी लागेल.
अडीच हजारांवरून थेट 25 हजार फी
केंद्र सरकारने लागू केलेले नवीन नियम दुचाकी, तीनचाकी, लाइट मोटर व्हेईकल, मालवाहतूक वाहनांसह सर्व गाडय़ांना लागू होणार आहेत. सर्वात जास्त फटका जुन्या ट्रकला बसणार आहे. याआधी ट्रक आणि बसला फिटनेस फीसाठी 2500 रुपये मोजावे लागत होते, परंतु आता त्यांना थेट 25 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
वाहन जुनी फी नवीन फी
तीनचाकी वाहन 400 ते 600 7 हजार रुपये
कार 600 ते 1 हजार 15 हजार रुपये
मध्यम वाहन 1800 रुपये 20 हजार रुपये
जड वाहने (ट्रक-बस) 2500 रुपये 25 हजार रुपये



























































