एआयचा फुगा फुटला तर कंपन्यांचे काही खरे नाही

सध्या सर्वत्र एआयचीच चर्चा आहे. अशात गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी, जर एआय फुगा फुटला तर एआयमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांचे काही खरे नसेल, असे म्हटले आहे. एका मुलाखतीत सुंदर पिचाई म्हणाले की, एआयमधील गुंतवणुकीत झालेली वाढ ही एक असामान्य गोष्ट असली तरी, सध्याच्या एआय तेजीत काही प्रमाणात अविवेकीपणा आहे. जर एआयचा फुगा फुटला, तर त्यामुळे होणाऱ्या परिणामांपासून गुगल सुरक्षित राहील का? असे विचारले असता, पिचाई म्हणाले की, गुगल त्या संभाव्य परिणामांचा सामना करू शकेल, परंतु यावेळी त्यांनी इशाराही दिला. ते म्हणाले, ‘मला वाटते की कोणतीही पंपनी, आमच्यासह, यातून सुटणार नाही.’ गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी यावेळी युजर्सनाही इशारा दिला की, त्यांनी एआयकडून मिळणार्या प्रत्येक माहितीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये, असेही ते म्हणाले.