IND vs SA 2nd Test – टीम इंडियाला धक्का! शुभमन गील दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही, या खेळाडूची लागणार वर्णी

गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर 22 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. मात्र या दुसऱ्या कसोटी सामन्याआधीच हिंदुस्थानला मोठा झटका मिळालेला आहे. शुभमन गिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामन्यात सहभागी होता येणार नाही. त्यामुळे आता गिलच्या अनुपस्थितीत उपकर्णधार ऋषभ पंत टीम इंडियाचा कर्णधाराची धुरा सांभाळेल. तर गिलच्या जागी साई सुदर्शनची वर्णी लागू शकते.

टीम इंडिया आणि आफ्रिका यांच्यात होणारा दुसऱ्या कसोटी सामना 22 ते 26 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. असे असताना आता सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका बसलेला आहे. कर्णधार शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारा दुसरा कसोटी सामना खेळणार नाही. शुभमन गिल टीम इंडियासोबत गुवाहाटीला पोहोचला आहे, मात्र अजूनही त्याच्या मानेला झालेली दुखापत अद्याप पूर्ण बरी झालेली नसून त्याला विश्रांतिची गरज आहे.

कोलकाता कसोटीत टीम इंडियाच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना शुभमन गिलला दुखापत झाली होती आणि त्याच दुखापतीमुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. दुखापतीने त्रस्त असलेल्या गिलने दुसऱ्या डावातही फलंदाजी केली नव्हती.