
कारगिलच्या ‘ऑपरेशन विजय’ मध्ये कामगिरी बजावलेले सेवानिवृत्त मेजर आणि अंबरनाथमधील प्राचीन शिव मंदिर येथील अमरशक्ती मंडळाचे कार्यकर्ते भानुदास डुबे (47)यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.
अहिल्यानगर जिह्यातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरी हे मूळ गांव असलेले भानुदास डुबे हे लहानपणापासून अंबरनाथ येथेच वास्तव्याला होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सैन्यात सेवा केली. कारगिलच्या ‘ऑपरेशन विजय’मध्ये त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली होती.


























































