शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र, त्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही – संजय राऊत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत, ही लोकेच्छा आहे. त्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

X वर एक पोस्ट करत संजय राऊत म्हणाले आहेत की, “दिल्लीतून आदेश आल्याशिवाय म न से ला आघाडीत घेणार नाही. मुंबई कांग्रेस हा कांग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत. ही लोकेच्छा आहे. त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही. श्री शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत, मुंबई वाचवा.”