Mumbai news – पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेंच्या डॉक्टर पत्नीनं जीवन संपवलं, 10 महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले आहे. अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी शनिवारी सायंकाळी वरळीतील राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले. दोघांचा फेब्रुवारी 2025 मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर अवघ्या 10 महिन्यात डॉ. गौरी यांनी जीवन संपवल्याने खळबळ उडाली असून कौटुंबिक वादाहून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

डॉ. गौरी पालवे या वरळी बीडीडी येथे राहत होत्या. केईएम रुग्णालयातील डेंटिस्ट विभागामध्ये त्या कार्यरत होत्या. शनिवारी सायंकाळी त्यांनी गळफास घेत जीवन संपवले. कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळत असून या प्रकरणी वरळी पोलीस स्थानकात अपमृत्युची नोंद करण्यात आली आहे. डॉ. गौरी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएण रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.