
रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका, मुंबई हातातून गेली तर सत्ताधारी थैमान घालतील, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱअयांवर हल्ला चढवतानाच मुंबईकरांना सावध राहण्याचे आवाहन केले. ज्या पध्दतीचे राजकारण सध्या सुरू आहे, त्या परिस्थितीत आपण गाफील राहिलो तर मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक असेल, मुंबई हातातून गेलीच असे समजा, असा धोक्याचा इशाराही त्यांनी दिला.
शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 203 मधील कामगार मैदानात आयोजित 11 व्या कोकण महोत्सवाला राज ठाकरे यांनी भेट दिली. त्याप्रसंगी त्यांनी आपले विचार मांडले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मतदार याद्या नीट तपासून पहा, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.




























































