
बाॅलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधन झाले. त्यानंतर अभिनेत्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दिवंगत अभिनेते दिलीप कुमार धर्मेंद्र यांना त्यांचा धाकटा भाऊ मानत होते. यामुळे धर्मेंद्र सायरा बानो यांना त्यांची वहिनी मानत असे.
एनडीटीव्हीशी बोलताना सायरा बानो म्हणाल्या, “धर्मेंद्र यांच्या निधनाचे दुःख विसरणे कठीण आहे. दिलीप साहेब (दिलीप कुमार) त्यांना त्यांचा धाकटा भाऊ मानत असत. ते अनेकदा आमच्या घरी दिलीप साहेबांशी बोलण्यासाठी, जेवण्यासाठी आणि कधीकधी मद्यपान करण्यासाठी येत असत. दिलीपजी आणि धर्मेंद्रजी यांच्यातील नाते हे खूप घट्ट होते. धर्मेंद्र यांच्या जाण्याची पोकळी कधीही न भरून येण्याजोगी आहे. धर्मेंद्र यांनी दिलीप साहेबांना कायम आपला आदर्श मानले होते. त्यांच्यात खूप खास नाते होते.
धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील एका गावात झाला होता. त्यांचे खरे नाव धर्मेंद्र केवल कृष्ण देओल होते. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केले, नंतर ते हेमा मालिनी यांचे जीवनसाथी बनले.
1960 मध्ये “दिल भी तेरा हम भी तेरे” या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या धर्मेंद्र यांनी ॲक्शन, रोमान्स आणि कॉमेडी या प्रत्येक प्रकारात आपली छाप सोडली. ७० च्या दशकात ते ‘ही-मॅन’ म्हणून ओळखला जाऊ लागले. “फूल और पत्थर,” “मेरा गाव मेरा देश,” “यादों की बारात,” “नौकर बीवी का,” “बेताब,” “घायल,” आणि “शोले” सारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे.


























































