अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडी अपघात प्रकरण, जखमी कुसुम सुदे यांचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू

उपमुख्यमंत्री अजित पवार दिनांक 22 रोजी परतुर होऊन औसा येथे प्रचारासाठी जात असताना तेलगाव धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाने झालेल्या अपघातात कुसुम सुदे या गंभीर जखमी झाल्या होत्या. लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अपघात एवढा भयंकर होता की या अपघातात जखमी झालेल्या कुसुम सुदे यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. उपचार दरम्यान दि. 25नोव्हेबर रोजी त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

विष्णू दामोदर सुदे (35) हे मोटारसायकल वरून आपल्या कुटुंबासोबत जात असताना अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या गाडीची जोरदार धडक बसल्याने विष्णू सुदे यांच्या कुटुंबातील पत्नी कुसुम सुदे, दोन लहान मुली रागिणी (9) अक्षरा (6) अपघात गंभीर जखमी झाले होते. या सर्वांवर सह्याद्री हॉस्पिटल लातूर येथे उपचार सुरू होते. यातील महिला कुसुम सुदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे सुदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दोन निष्पाप मुलीच्या डोक्यावरील आईचे छत्र हरवले.

या अपघाताची चौकशी करून संबंधितावर खडक कारवाई करण्याची मागणी सुदे कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी केली आहे. हृदय द्रावक घटनेने व्हीआयपीच्या ताब्यातील वाहनांचा वेग व सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उभा केले आहे.