
देशातील आघाडीची पेंट्स आणि डेकोर ब्रँड एशियन पेंट्स बीसीसीआयचा ‘ऑफिशियल कलर पार्टनर’ बनला आहे. एशियन पेंट्स आणि बीसीसीआयमध्ये पुढील तीन वर्षांसाठी करार झाला आहे. हिंदुस्थानात आगामी तीन वर्षात होणाऱ्या पुरुष, महिला आणि देशांतर्गत क्रिकेटच्या 110 हून अधिक लढतींचा या करारात समावेश आहे. यावेळी एशियन पेंट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अमित सिघल, बीसीसीआयचे प्रवक्ते देवजित सायका उपस्थित होते.



























































