
पैशांसाठी लोक कोणच्या थराला जातील याचा काही नेम नाही. आजी- आजोबा, आई- वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी लोक काय काय करू शकतात. याचाच प्रत्यय इटलील आलाय. इटलीतील एका व्यक्तीने त्यांच्या आईच्या पेंशनसाठी अनोखी शक्कल लढवली. तो आपल्या मृत आईचे रुप घेऊन पेन्शन घेण्यासाठी बँकेत गेला होता. शिवाय, त्याने तीन वर्षांपूर्वी मृत झालेल्या त्याच्या आईचे शरीर ममी करून घरी ठेवले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती आपल्या आई सारखे कपडे घालून, तिच्यासारखा मेकअप करून आणि आवाज बदलून सराकारी कार्यालयात जायचा. याशिवाय, त्याने त्याच्या आईच्या मृत्यूनंतर तिचे ओळखपत्र पुन्हा बनवले. यामुळे तिच्या पेन्शन आणि तीन मालमत्तांमधून दरवर्षी अंदाजे 61,000 डॉलर कमावत होता. सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या आवाजावर आणि मानेवर संशय आल्यावर संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
घरात आढळला तीन वर्षांच्या आईचा मृतदेह
तक्रारीनंतर, चौकशी करण्यात आली आणि मुलाचे आणि खऱ्या आईचे फोटोची तुलना केल्यानंतर सत्य उघड झाले. तपासादरम्यान मुलाने अधिकाऱ्यांना त्याच्या घराची झडती घेण्याची परवानगी दिली. यावेळी पोलिसांना कपडे धुण्याच्या खोलीत ग्रेजिएला डाल’ओग्लियोचा ममी केलेला मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी तो मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी पाठवला. पोस्टमॉटर्म रिपोर्ट आल्यानंतरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, असे पोलिसांनी सांगितले.
इटालियन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला “मिसेज डाउटफायर-स्टाइल स्कैंडल” असे नाव दिले आहे. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार ही कथा 1993 च्या चित्रपटासारखी आहे ज्यामध्ये एक पुरूष मुलांना भेटण्यासाठी स्त्रीच्या वेशात येतो. ही घटना इंटरनेटवर व्हायरल होताच लोकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका वापरकर्त्याने लिहिले, “सत्य कधीही लपत नाही; ते नेहमीच बाहेर येते.” दुसऱ्याने लिहिले, “थोडासा लोभ तुम्हाला आयुष्यभर पश्चात्ताप करायला लावेल.” दुसऱ्याने लिहिले, “तुमच्या आईच्या मृत्यूचे निमित्त करून, या माणसाने मातृत्वाची थट्टा केली आहे, अशा शब्दात टीका केली आहे.



























































