नॅशनल क्रश बनल्यानंतर गिरिजा ओकला येऊ लागलेत अश्लील मेसेज, वाचा नेमकं काय घडलं?

सध्याच्या घडीला तुमचं वजन हे सोशल मीडियावर तुम्ही किती लोकप्रिय आहात यावरून ठरतं. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले हीच्या एका निळ्या साडीतील फोटोने सोशल मीडियावर वाहवा मिळवली. ही वाहवा फक्त एका वर्गापुरती न राहता गिरिजा ही अवघ्या काही तासांमध्ये नॅशनल क्रश बनली. परंतु नॅशनल क्रश झाल्यानंतर गिरिजाला मात्र अतिशय वाईट अनुभव येऊ लागले आहेत.

National Crush बनताच गिरीजाचे फॉलोवर्स धडाधड वाढले, दोन दिवसातच कमावले लाखो चाहते

लल्लनटाॅपच्या मुलाखतीमध्ये नॅशनल क्रश झाल्यावर काय बदललं, यावर गिरिजा म्हणाली कामाच्या आॅफर्स मला अजून आल्या नाहीत. परंतु आलेले मेसेजेस मात्र खूपच विचित्र आणि अश्लील आहेत. यावर अधिक बोलताना गिरिजाने तिला आलेले मेसेज कसे आहेत हे सांगितले.

नुकत्याच झालेल्या मुलाखतीच्या माध्यमातून तिने हे वाईट अनुभव सांगितले. अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीचीही काळी बाजू कशी असते हे तिने उलगडून सांगितले. ती म्हणाली, मला इंस्टाग्रामवर सध्या इतके भयावह मेसेज येताहेत की विचारता सोय नाही. एकाने तर मला मेसेज करुन एका तासाचा रेट विचारला आहे. तर दुसऱ्याने मला असं म्हटलं की, मी तुझ्यासाठी काहीतरी करु इच्छितो, मला संधी द्या… या सर्व गोष्टी इतक्या भयावह आहे की विचारता सोय नाही.