प्रसिद्ध पान मसाला व्यावसायिकाच्या सूनेने उचलले टोकाचे पाऊल, वाचा

कमला पसंद या पान मसाला व्यावसायिकाच्या सूनेने दीप्ती चौरसिया (४०) यांनी मंगळवारी संध्याकाळी आत्महत्या केली. पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी कुटूंबाने आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचे म्हटले आहे. दीप्तीने २०१० मध्ये कमल किशोर यांचा मुलगा हरप्रीत चौरसियाशी लग्न केले. त्यांना १४ वर्षांचा मुलगा आहे. हरप्रीतची दोन लग्न झालेली असून, त्यांची दुसरी पत्नी ही दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. वसंत विहार पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या वृत्तानुसार मृतदेह स्कार्फला लटकलेला आढळला. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून, पोलिस सध्याच्या घडीला मात्र यावर अधिक बोलणे टाळत आहेत. कमला पसंद या पान मसल्याचा व्यवसाय हा कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि मुंबई येथे पसरलेला आहे.

कमला कांत चौरसिया यांनी कानपूरच्या फीलखाना परिसरात गुटख्याचा व्यवसाय सुरू केला. सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वी ते एका किओस्कमध्ये पान मसाला उघड्यावर विकायचे, पण आज त्यांच्या कंपनीची उलाढाल अब्जावधी रुपयांची आहे. त्यांच्या पान मसाला गुटख्याचे अनेक ब्रँड आहेत. कमल कांत चौरसिया यांनी १९८०-८५ दरम्यान घरी पान मसाला बनवण्यास सुरुवात केली. ते कहू कोठी येथे पान मसाला विकायचे.