IND vs SA – लज्जास्पद.. लाजिरवाणा..! टीम इंडियाचा 408 धावांनी दारूण पराभव, आफ्रिकेनं 25 वर्षांनी जिंकली हिंदुस्थानात कसोटी मालिका

गुवाहाटी कसोटीमध्ये हिंदुस्थानला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला आहे. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानचा तब्बल 408 धावांनी दारूण पराभव केला. आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 549 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानचे बॅटर 140 धावांमध्ये गारद झाले आणि आफ्रिकेने 25 वर्षानंतर हिंदुस्थानमध्ये मालिका विजय मिळवला. कोलकाता येथे झालेल्या कसोटीत आफ्रिकेने 30 धावांनी विजय मिळवला होता आणि आता गुवाहाटी कसोटीही खिशात घातल्याने आफ्रिकेने निर्भेळ यश मिळवले.

पहिल्या डावात 288 धावांची आघाडी घेतलेल्या आफ्रिकेने दुसरा डाव 5 बाद 260 धावांवर घोषित करत हिंदुस्थानसमोर विजयासाठी 549 धावांचा डोगर ठेवला होता. या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीपासूनच हिंदुस्थानच्या संघाची दमछाक झाली. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यत हिंदुस्थानचे सलामीवीर माघारी परतले होते. त्यानंतर पाचव्या दिवशी खांदे पडलेल्या हिंदुस्थानच्या संघाने हार्मरपुढे शरणागती पत्करली.

हार्मरच्या फिरकीत अडकून हिंदुस्थानचे 6 फलंदाज बाद झाले. केशव महाराजने त्याला उत्तम साथ देत 2 विकेट्स घेतल्या. मार्को यानसन आणि सेनुरम मुथुसामी याने प्रत्येकी एक विकेट घेतली. हिंदुस्थानचा संघ 63.5 षटकांमध्ये 140 धावांमध्ये बाद झाला. रवींद्र जाडेजा (54 धावा) वगळता एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही.

बातमी अपडेट होत आहे…