
राजापूरमधील शिंदे गटाचे पदाधिकारी व माजी जिल्हापरिषद सदस्य दिनेश जैतापकर यांनी बुधवारी मातोश्री येथे त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून स्वागत केले.

यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाप्रमुख दत्ता कदम आणि इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.




























































