हिंदुस्थानींचा खाण्यापिण्यावर 30 टक्के खर्च

जगभरातील लोकांचा खाण्यापिण्यावर वेगवेगळा खर्च होतो. अमेरिकेतील कुटुंबाचा खाण्यापिण्यावर कमाईतील केवळ 6.8 टक्के खर्च होतो, तर हिंदुस्थानातील नागरिकांचा कमाईतील 29.9 टक्के खर्च होतो. नायजेरियात सर्वात जास्त 59.3 टक्के, बांगलादेशातील नागरिकांचा 52.8 टक्के, युक्रेनचा 41.7 टक्के, इथियोपिया 37.9 टक्के, पाकिस्तान 37.8 टक्के, व्हिएतनाम 34.9 टक्के, इंडोनेशिया 33.5 टक्के, श्रीलंका 27.1 टक्के, रशिया 25.3 टक्के, चीन 21.2 टक्के, सौदी अरब 20.5 टक्के, जपान 15.8 टक्के, फ्रान्स 12.6 टक्के, यूएई 12.2 टक्के, जर्मनी 11.6 टक्के, ऑस्ट्रेलिया 9.9 टक्के, कॅनडा 9.7 टक्के, यूके 8.7 टक्के खर्च होतो.