पाकिस्तानात विदेशी मुद्रा कॅशमध्ये देणे बंद

पाकिस्तानातील केंद्रीय बँक स्टेट ऑफ पाकिस्तानने विदेशी मुद्राच्या विक्रीवर कडक नियम लागू केले आहेत. या नियमांतर्गत आता नागरिकांना कॅश डॉलर मिळवणे अवघड आहे. नव्या आदेशांतर्गत कोणत्याही व्यक्तीला आता कॅशमध्ये विदेशी मुद्रा ठेवता येणार नाही. डॉलर किंवा कोणतीही विदेशी मुद्रा थेट बँक खात्यात ट्रान्सफर केली जाणार आहे. डॉलर खरेदी केल्यानंतर ग्राहकाला रोख डॉलर मिळणार नाही. एक्सचेंज कंपन्या कॅशऐवजी चेक देतील किंवा ग्राहक आपल्या खात्यात रक्कम जमा करतील. ज्यांच्याकडे एफसीवाय अकाऊंट नाही, त्यांना कॅश डॉलर खरेदी करता येणार नाही. सर्व ट्रान्जेक्शन अकाऊंट टू अकाऊंट असतील.