
लग्नाच्या मिरवणुकीला जात असताना कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदताकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बबलू सोनकर, श्यामलाल सोनकर आणि राजू सोनकर अशी मयतांची नावे आहेत.
उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये हा भीषण अपघात घडला. वाराणसीतील कॅन्टोन्मेंट पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी सेवानाला गावात लग्नाच्या वरातीसाठी चालले होते. यादरम्यान केरकट पोलीस स्टेशन परिसरातील मुफ्तीगंज मार्केटमध्ये चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दरीत कोसळली.
अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने कारमधील सर्वांना बाहेर काढत रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात जात असताना वाटेतच तिघांचा मृत्यू झाला. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.




























































