ऑफिस नाही, कामाचा ताण नाही फक्त मौजमजा करायची…एलन मस्क यांचा एआयबाबत महत्वाचा दावा

तंत्रज्ञान ज्या वेगाने प्रगती करत आहे ते भविष्याचे वेगळेच रुप रंगवत आहे. आज आपण नोकऱ्या, कार्यालये आणि कामाला आवश्यक मानतो, भविष्यात वेगळी परिस्थिती असेल.येत्या काळात माणसांची भूमिका पूर्णपणे बदलेल. लोकांना आता काम करण्याची गरज राहणार नाही. कारण एआय आणि यंत्रे त्यांची जागा घेणार आहेत. त्यामुळे माणसांसाठी काम किंवा रोजगार गरज राहणार नसून एक छंद बनेल असे म्हटले आहे.

 इंफोसिसचे सह-संस्थापक आणि एल अॅण्ट टीचे सीईओ नारायण मूर्ति यांनी काही महिन्यांपूर्वी भारतीयांनी आठवडय़ाला 70 ते 90 तास काम करावे, असा सल्ला दिला होता. याउलट आता एलन मस्क यांनी जेरोधाचे सह निर्माते कामत यांच्या पॉडकास्ट People by WTF मध्ये सांगितले की, पुढच्या दहा ते वीस वर्षात मानव इतिहासात मोठा बदल घेऊन येऊ शकतो.  भविष्यात नोकरी करणं हा फक्त एक पर्याय असेल. आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि रोबोटिक्स इतकं प्रगत झालं आहे की, जास्ततर मशीन काम करणार आणि माणसं केवळ त्यांच्या आवडीची कामं करणार. मस्क यांचे हे वक्तव्य तेव्हा समोर आले जेव्हा हिंदुस्थानात कामाच्या तासांवरुन वादंग निर्माण झाला आहे.याउलट मस्क यांच्या म्हणण्यानुसार, भविष्यात व्यक्ती गर्दीच्या शहरात काम करुदेत, दूर करुदेत किवा काम नाही करुदेत. ही त्यांची वैयक्तिक आवड असणार आहे.

पॉडकास्ट दरम्यान, जेव्हा निखिल कामत यांनी जगभरात सुरू असलेल्या तीन दिवसांच्या आणि चार दिवसांच्या वर्क वीक चाचण्यांचा उल्लेख केला तेव्हा मस्क विनोदाने म्हटले ते माझ्यासाठी नाही. नंतर ते विनोदाने म्हणाले की, भविष्यात लोकं अर्धा आठवडाच काम करणार किंवा काम अजिबात करणार नाहीत. तो एक छंद असेल. मस्क उदाहरण देताना म्हणाले की, तुम्ही भाजी घरीही पिकवू शकता आणि बाजारातूनही आणू शकतात. तसेच भविष्यात कामाचेही असेच काहीसे होईल. आपण आता वैविध्यपूर्ण आणि कौशल्यप्रधान युगात प्रवेश करत आहोत. जिथे कामं मशिनं करतील. खर्च कमी होतील आणि माणूस त्याच्या आवडीचे काम करेल. तज्ज्ञ सांगतात की, असं तेव्हाच शक्य आहे जेव्हा तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन त्याचे नियोजन केले जाईल. आर्थिक व्यवस्था पूर्णपणे बदललेली असेल असेही ते म्हणाले.