कोकणातील दशावतारी नाट्यसंस्कृती जपण्यासाठी ‘माता यशोदा’चा पुढाकार

प्रातिनिधिक फोटो

कोकणातील दशावतार कला नाटय़ संस्कृती जपण्यासाठी श्रीकृष्ण हरचांदे यांच्या नेतृत्वाखाली ‘माता यशोदा’तर्फे यंदाही भाई व आबा कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाटय़ मंडळ, नेरूर यांचा दशावतारी नाटय़प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. हा प्रयोग 23 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वाजता नांदोस, गडकरी वाडा येथील भव्य प्रांगणात होणार आहे.

बाबी कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाटय़ मंडळ, नेरूरचे संचालक भाई कलिंगण रसिक मायबापासाठी या वर्षीचा नावीन्यपूर्ण आगळय़ावेगळय़ा ट्रिक सिन्सनी नटलेला संघर्षमय नाटय़प्रयोग या दिवशी सादर करणार असून यामध्ये उत्कृष्ट ध्वनिक्षेपण व आकर्षक लाइट व्यवस्था असून रसिकांसाठी विशेष आसन व्यवस्थाही करण्यात येणार असल्याची माहिती माता यशोदा परिवारातील गणेश रमेश पार्टे, नंदा पार्टे, रत्नकांत काळसेकर, नाथा कदम, नंदू पार्टे यांनी दिली.