
घरातील दूध खराब होऊ नये, यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जर तुम्ही काळजी घेतली नाही तर दूध खराब होण्याची भीती असते. त्यामुळे सर्वात आधी दूध नेहमी फ्रिजमध्ये ठेवा. ते फ्रीजच्या दारात न ठेवता आतल्या थंड भागात ठेवा. nदूध उकळल्यानंतर लगेच थंड करा. हे दूध लवकर खराब होण्यापासून वाचवते. दुधात चिमूटभर बेकिंग सोडा मिसळल्यास ते लवकर खराब होत नाही. दूध दूषित होऊ नये म्हणून ते हवाबंद डब्यातच साठवा. दूध खरेदी करण्यापूर्वी त्याची कालबाह्यता तारीख तपासा आणि त्यापूर्वीच ते वापरा.



























































