स्वराज कौशल यांचे निधन

माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांचे पती व भाजपच्या खासदार बांसुरी स्वराज यांचे पिता स्वराज कौशल यांचे आज निधन झाले. ते 73 वर्षांचे होते.

स्वराज कौशल यांचा जन्म 12 जुलै 1952 रोजी हिमाचल प्रदेशमध्ये झाला होता. स्वराज कौशल हे सर्वात कमी वयात राज्यपाल बनणारे व्यक्ती ठरले होते. ते वयाच्या 37व्या वर्षी 1990मध्ये मिझोरमचे राज्यपाल झाले होते. ते 1993पर्यंत राज्यपाल पदावर होते. याशिवाय 1998 ते 2004 या कालावधीत हरयाणा येथून राज्यसभेवरदेखील निवडून गेले होते. स्वराज कौशल हे व्यवसायाने वकील होते.