
दुखापत झाल्यास हाताला पूर्ण आराम द्या. कोणतीही हालचाल टाळा. हालचालीमुळे हाताच्या वेदना वाढतील. ज्या ठिकाणी दुखापत झाली आहे, त्या ठिकाणी 15 मिनिटे बर्फाचा शेक द्या. दिवसातून तीन ते चार वेळा हे करा. बर्फ त्वचेवर थेट लावू नका. स्वच्छ आणि सुती कापडात गुंडाळून बर्फ लावा.
दुखापत झालेल्या ठिकाणी सूज येऊ नये यासाठी हलक्या हाताने कापडी पट्टी बांधा, पण ती जास्त घट्ट बांधण्याचे टाळा. हात हृदयाच्या जवळ धरून ठेवा. त्यामुळे सूज कमी होण्यास मदत मिळेल. सूज आणि वेदना कमी झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, हलके स्ट्रेचिंग व व्यायाम सुरू करा.

























































