असं झालं तर… चुकीचा ईएमआय वसूल केल्यास?

बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर तत्काळ ईएमआय सुरू होतो. परंतु कधी कधी कर्ज फेडल्यानंतरसुद्धा बँकेकडून चुकून अतिरिक्त ईएमआय वसूल केला जातो.

जर कोणत्याही बँकेकडून तुमच्या खात्यातून चुकून ईएमआय कापला गेला असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. ज्या बँकेत तुमचे खाते आहे, त्या बँकेशी संपर्क साधा.

तुमच्या लोन क्लोजर लेटर आणि पेमेंट पावत्यांच्या प्रती जतन करून ठेवा. चुकीचा ईएमाय कापला गेला आहे हे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे महत्त्वाचे ठरतील.

तुमच्या तक्रारीनंतर बँक तुमच्या समस्येचे निराकरण करेल आणि अतिरिक्त जमा झालेली रक्कम तुमच्या खात्यात परत जमा करेल किंवा ईएमआय भरावा लागणार नाही.

जर बँकेने चुकीचा ईएमआय भरला असेल, तर क्रेडिट स्कोअरवर याचा परिणाम होणार नाही. जर ईएमआय भरण्यास चुकला असाल, तर क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो.