
विमानात कबूतर उडत असल्याचा व्हिडीओ चांगला व्हायरल होत आहे. ही घटना बंगळुरू-वडोदरा इंडिगो विमानात घडली. व्हिडीओमध्ये दिसते की एक कबूतर प्रवाशांच्या डोक्यावरून सतत उडत आहे. क्रू मेंबर्सनी ते पकडण्याचा खूप प्रयत्न केला, पण कबूतर एका जागेवर न थांबता सतत इकडून तिकडे उडत होते. काही प्रवासीदेखील पकडण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांनाही यश मिळाले नाही. बहुधा कबूतर बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असावं. ही संपूर्ण घटना काही प्रवाशांनी कॅमेऱयात कैद केली आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला. व्हिडीओ og.kya.sochenge या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 9 लाख 44 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.




























































