नीता अंबानी यांचा स्वदेशी आणि पारंपारिक लूक; स्वदेशीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम

हिंदुस्थानी कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा नावलौकिक जगभरात पोहोचविण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी इरॉसच्या प्रमुख स्टोअर स्वदेश येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात स्वदेशी हस्तकलेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

नीता अंबानी यांनी यावेळी नेसलेली स्वदेशी आणि पारंपारिक साडी खास आकर्षण होते. स्वदेशच्या स्वतःच्या संग्रहातील मोरपिशी साडी तिच्या मीना नक्षीमुळे आकर्षक दिसली. निता अंबानी यांनी स्वदेश डिझाईन केलेली साडी नेसली होती. तर मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला ब्लाऊज त्यांनी घातला होता. ज्यामध्ये पोल्की बॉर्डर, देवता आणि चिन्हे असलेले हाताने बनवलेली बटणे होते. ब्लाउजमध्ये मागील बाजूस विंटेज स्पिनल टॅसल देखील होते, जे नीता अंबानींच्या वैयक्तिक संग्रहातून घेतले होते, ज्यामुळे त्यांचा लूक आणखी खास बनला. या साडीत पारंपारिक जरीसह विणलेल्या बारीक डिझाईन आहेत. नीता अंबानी यांनी हिंदुस्थानातील कलाकार आणि कारागिरांचा सन्मान करण्यासाठी इरोस येथील स्वदेश स्टोअरमध्ये हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये त्या स्वदेशच्या मोरपिशी बनारसी साडीत खूपच सुंदर दिसत होत्या. त्यांच्या साडीतील गुंतागुंतीचे मोराचे डिझाईन्स मीनाकारी वापरून पारंपारिक भरतकाम विणकाम तंत्राचा वापर करून बनवण्यात आले होते.

या साडीसोबत नीता अंबानी यांनी 100 वर्षांहून अधिक जुने अँटीक कुंदन पोल्की कानातले घातले होते. त्यांनी बोटामध्ये स्वदेशमधील हस्तनिर्मित स्टडेड बर्ड रिंग देखील घातली. त्यांच्या लूकचे मुख्य आकर्षण म्हणजे हाताचे फूल होते , जे त्यांच्या आईच्या दागिन्यांच्या संग्रहातील असून तो एक मौल्यवान वारसा आहे. या पोषाखावर त्यांनी हेअरस्टाईल साधी ठेवली. त्यांनी मध्ये भांग पाडून केसांचा अंबाडा घातला होता त्यावर पांढऱ्या फुलं माळली होती. चेहऱ्यावर हलका मेकअप करुन कपाळावर लाल टीकली लावली होती.