जपानला 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का; त्सुनामीचा इशारा

जपानला तीव्र भूकंपाचा धक्का बसला आहे. जपान हवामान संस्थेच्या माहितीनुसार, आओमोरी प्रांतात 7.6 तीव्रतेचा भूकंप झाला. हवामान संस्थेने आओमोरी, इवाते आणि होक्काइडो प्रांतांना त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार सोमवारी सायंकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. आओमोरी प्रांतातील मिसावाच्या पूर्व-ईशान्येस 84 किमी अंतरावर हा भूकंप झाला.

दरम्यान, जपानच्या हाचिनोहे किनाऱ्याजवळ 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा भूकंपाचा धक्का बसला. हा भूकंप हाचिनोहेच्या पूर्व-ईशान्येस 96 किमी अंतरावर झाला. यात कोणीही जखमी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.