मोदींचे 85 टक्के विदेश दौरे अधिवेशन काळात

संसदेचे अधिवेशन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णवेळ सभागृहात नसतात. एक-दोन चर्चेत सहभागी होतात. अधिवेशनाची सांगता होत असताना शेवटच्या भाषणासाठी ते मात्र संसदेत हजेरी लावतात. मग अधिवेशन काळात इतर वेळी मोदी काय करतात? या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. ते विदेश दौरे करतात. पंतप्रधान मोदींनी 11 वर्षांत 94 विदेश दौरे केले. त्यातील 85 टक्के दौरे संसदेच्या अधिवेशन काळातच केले आहेत. त्याचा तपशील देत ‘संसद चले देश में, मोदी चले विदेश में,’ अशी स्थिती असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.