
महाराष्ट्र राज्य वीज वितरण पंपनीमध्ये 300 पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. या पदांमध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदांच्या 94 जागा, अतिरिक्त कार्यकारी अभियंताच्या 5 जागा, उपकार्यकारी अभियंता पदांच्या 69 जागा, उपकार्यकारी अभियंता (सिव्हील) पदांच्या 12 जागा, वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या 13 जागा, व्यवस्थापक पदांच्या 25 जागा आणि उपव्यवस्थापक पदांच्या 82 अशा एकूण 300 जागांसाठी ही भरती केली जात आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 आहे. परीक्षाची तारीख नंतर कळवण्यात येईल, असे जाहिरातीत म्हटले आहे. अर्ज करणाऱया उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता बीई, बीटेक (इलेक्ट्रिक) आणि सिव्हील तसेच 7 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ऑनलाइन अर्जासोबत 500 रुपये प्लस जीएसटी आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 250 रुपये प्लस जीएसटी भरावे लागणार आहे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट https://www.mahadiscom.in वर देण्यात आली आहे.

























































