
वांद्रे शासकीय वसाहतीच्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत भाग घेताना शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी ‘शिंदे सेना’ असा उल्लेख केला त्यावर आम्हाला निवडणूक आयोगाने शिवसेना-धनुष्यबाण दिले आहे. त्यामुळे आमचा उल्लेख शिवसेना असा करा असे मंत्री शंभुराज देसाई म्हणाले त्याला प्रत्युत्तर देताना ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पत्रकार परिषदेत चार वेळा शिंदे सेना’ असा उल्लेख केल्याची वरुण सरदेसाई यांनी आठवण करून दिली.
वांद्रे वसाहतीच्या पुनर्विकास समितीमध्ये भाजप, शिंदे सेना, अजित पवार गटाचे पदाधिकारी घेतले. पण स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने मला समितीत का घेतले नाही, असा सवाल वरुण सरदेसाई यांनी केला. त्यातील शिंदे सेना यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी आक्षेप घेतला. त्यावर वरुण सरदेसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच तुम्हाला ‘शिंदे सेना’ असे संबोधल्याची जाणीव भर सभागृहात मिंधे गटाला करून दिली.

























































