शिक्षक पती-पत्नीचा धुक्यामुळे अपघातात मृत्यू

पंजाबमध्ये निवडणुकीच्या कामासाठी जात असताना एका शिक्षक जोडप्याचा अपघाती मृत्यू झाला. हा अपघात धुक्यामुळे झाला आहे. धुक्याचा अंदाज न आल्याने कार थेट नाल्यात कोसळली. यात या दोघांचाही मृत्यू झाला. जसकिरण सिंह भुल्लर (47) आणि कमलजीत कौर (46) असे या मृत्युमुखी पडलेल्या जोडप्यांची नावे आहेत. निवडणुकीच्या कामासाठी ते मरी मुस्तफा या गावी जात होते. पंजाबमध्ये सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत.