
संगीता बरूआ पिशरोटी यांची 2025-26 च्या कार्यकाळासाठी प्रेस क्लब ऑफ इंडिया (पीईसीआय) च्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या 67 वर्षांतील इतिहासात पहिल्यांदाच या पदावर महिलेची निवड झाली आहे. तसेच पूर्वोत्तर भारतातून अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या पत्रकार आहेत. बरूआ पॅनेलने 21 जागा जिंकल्या. संगीता बरूआ यांना 1010 मते मिळाली.


























































