हिंदुस्थानींची सिंगापुरात लक्झरी वस्तूंवर उधळपट्टी

सिंगापुरात पर्यटक म्हणून गेलेल्या हिंदुस्थानी नागरिकांनी लक्झरी वस्तू आणि सेवेवर रेकॉर्डब्रेक खर्च केला आहे. सिंगापूर पर्यटन बोर्डाने दिलेल्या आकडेवारीनुसार, हिंदुस्थानी पर्यटकांनी 2025 च्या पहिल्या सहामाहीत 81 कोटी डॉलर खर्च केले आहेत. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 4.40 टक्के अधिक आहे. हिंदुस्थानी पर्यटकांच्या संख्येत लागोपाठ वाढ झाली आहे. मागील 10 महिन्यांत सिंगापूरला पोहोचणाऱ्या पर्यटकांची संख्या 10 लाखांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 2.6 पट अधिक आहे