
अभिनेता रितेश देशमुख याचा आगामी ‘राजा शिवाजी‘ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. जेव्हापासून रितेशचा लूक समोर आला तेव्हापासून चाहत्यांना या चित्रपटाबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. रितेशने मंगळवारी या चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर करत महत्त्वाची माहिती दिली आहे.
View this post on Instagram
‘‘क्षणभर थांबलेला सूर्य… मावळतीचा मावळ… पण क्षणभरासाठीच… उद्याच्या तेजस्वी पहाटे साठी’ 100 दिवसांची मेहनत, निष्ठा, समर्पण आणि अपार जिद्द यावर अखेर पडदा पडला. असंख्य आठवणी, असंख्य अनुभव, आणि मनात कायम राहणारे क्षण. महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन घेऊन लवकरच येत आहोत !!!, अशी पोस्ट रितेश देशमुखने शेअर केली आहे.
रितेश देशमुखचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट असलेला हा चित्रपट 1 मे 2026 ला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण वाई, महाबळेश्वर, सातारा, मुंबई यांसह अनेक ऐतिहासिक ठिकाणी करण्यात आले आहे.
जिओ स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटात रितेश देशमुख सोबत संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख यांच्याही भूमिका आहेत.



























































