
25 वर्षे मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी म्हणून मुंबईकरांना अभिमान वाटेल अशी विकासकामे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहेत, याच विकासकामांबाबत ‘करुन दाखवलंय ते अभिमानाने सांगूया!’ हे सादरीकरण युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी वरळीतील एन. एस. सी. आय. डोम येथे केले. ही मुंबई आपली आहे, मुंबईकरांची आहे त्यामुळे इथे पहिला अधिकार आपलाच असायला हवा असं सांगत मुंबईचं अदानीस्तान होऊ देऊ नका असं आवाहन यावेळी केले. चला, सज्ज होऊया! आपली मुंबई आपल्यालाच वाचवायची आहे!






























































