
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याची बहीण आणि अभिनेत्री मालती चहर ही नुकतीच ‘बिग बॉस-19’मध्ये दिसली. तिने अनिल शर्मा याच्या ‘जीनियस’ या फिल्ममधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. हा चित्रपट काही विशेष चालला नव्हता. मात्र ‘बिग बॉस-19’मुळे ती घराघरात पोहोचली. आता तिने एका मुलाखतीमध्ये सिनेसृष्टीतील काळी बाजू उघड केली आहे. वडिलांच्या वयाच्या दिग्दर्शकाने जबरदस्ती आपले चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट मालती हिने केला.
एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावले आणि जबरदस्ती चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही एका प्रोजेक्टबाबत सातत्याने भेटत होतो. काम संपल्यावर आम्ही एकमेकांना आलिंगन दिले तेव्हा त्याने माझ्या ओठांचे जबरदस्ती चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे मी स्तब्धच झाले.
मला काय करावे हे देखील सूचत नव्हते. मी त्याला धक्का मारून तिघून निघून गेले आणि पुन्हा आयुष्यात त्याचे तोंडही पाहिले नाही. या अनुभवातून मी शिकले की कुणीही कुणाचे नसते. सिनेसृष्टीत तर कुणालाही वडिलांप्रमाणे समजण्याचीही चूक करायला नको. सगळ्यांपासून आपला बचाव केला पाहिजे, असे मालती चहर म्हणाली.
माझ्या वडिलांच्या वयाता माणूस माझ्यासोबत असे वर्तन करेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. या घटनेनंतर मी खूप चिडले होते. जेव्हा तुम्ही अशा अनुभवांबाबत बोलता तेव्हा लोक तुम्हाला काम देणे बंद करतात. तुम्ही कॉम्पोमाईज करणार नाही हे त्यांना कळून चुकलेले असते, तेव्हा तुम्हाला शेवटच्या क्षणी रिप्लेस केले जाते. मलाही याबाबत बरेसचे अनुभव आले आहेत, असेही मालती म्हणाली.


























































