
मुंबईत आढळलेल्या 11 लाखांकर दुबार मतदार नावांची छाननी पालिकेच्या माध्यमातून सुरू असून आतापर्यंत 80 हजारांकर नावे दोन ठिकाणी असल्याचे समोर आले आहे. मात्र या मतदारांची नावे पालिका वगळणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पालिका मतदाराच्या घरी जाऊन दुबार मतदाराकडून एकदाच मतदान करण्याबाबत हमीपत्र लिहून घेण्यात येईल. यानंतर ही माहिती दुबार नाव असलेल्या मतदान केंद्राकडे पाठवली जाईल. दुबार नावांपुढे डबल स्टार मार्किंग केले जाणार असून प्रत्यक्ष मतदानादिवशी तपासणीनंतरच मतदान करू दिले जाणार आहे.




























































