मेस्सीने दिली वनताराला भेट

जागतिक फुटबॉल आयकॉन लिओनेल मेस्सी यांनी अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र वनतारा येथे विशेष भेट दिली. या केंद्रात प्रत्येक उपक्रमाची सुरुवात सनातन धर्मानुसार आशीर्वाद घेऊन केली जाते.

निसर्गाविषयी आदर आणि सर्व सजीवांप्रति सन्मान अधोरेखित करणारी ही परंपरा आहे. मेस्सी यांनीदेखील पारंपरिक हिंदू विधींमध्ये सहभाग घेतला, वन्यजीवांचे निरीक्षण केले आणि काळजीवाहक व संवर्धन पथकाशी संवाद साधला. वन्यजीव संवर्धनाविषयीची त्यांची बांधिलकी आणि अनंत अंबानी यांच्याशी असलेली मैत्रीही यानिमित्ताने उजागर झाली.