एचडीएफसीचा झटका, एफडीच्या व्याजदरात कपात

खासगी बँक एचडीएफसीने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. बँकेने फिक्स्ड डिपॉझीट (एफडी) च्या व्याजदरात 0.25 टक्के कपात केली आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला आहे. नवीन दर बुधवारपासून लागू करण्यात आले आहेत. बँकेच्या या निर्णयानंतर आता सर्वसामान्य ग्राहकांना 90 दिवस ते सहा महिन्यांसाठी 4.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 4.75 टक्के, एका वर्षासाठी 6.25 टक्के ते 6.75 टक्के, दोन वर्षांसाठी 6.45 टक्के ते 6.95 टक्के, पाच वर्षांसाठी 6.15 टक्के ते 6.65 टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे.