
स्मार्टफोनचा जास्त वापर केल्यामुळे याचे दुष्परिणामही जाणवतात. फोनचा स्क्रीन टाईम कमी करणे ही आता काळाची गरज आहे. त्यामुळे काही गोष्टी नक्की फॉलो करा. सर्वात आधी फोनचे नोटिफिकेशन बंद करा. नोटिफिकेशनमुळे फोनकडे जास्त लक्ष जाते.
सोशल मीडिया अॅप्स होम स्क्रीनवरून काढून फोल्डरमध्ये ठेवा.
बेडरूम, जेवणाचे टेबल यांसारख्या जागांना ‘फोन-फ्री झोन’ म्हणून घोषित करा.
झोपण्यापूर्वी किमान एक तास फोन वापरणे बंद करा आणि तो दुसऱया खोलीत ठेवा.
सकाळी उठल्यावर लगेच फोन पाहण्याऐवजी व्यायाम, ध्यान किंवा पुस्तक वाचा.


























































