
ड्रम टाओ
टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) आणि ड्रम टाओने चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, मुंबई, जयपूर व कोलकाता येथे शोज सादर केले. ड्रम टाओने जगभरातील 10 दशलक्षहून अधिक प्रेक्षकांना मनोरंजनाचा आनंद दिला आहे.
पेनीअरबाय उपक्रम
बँकिंग व डिजिटल नेटवर्क पेनीअरबायने आपल्या डिजिटल नारी उपक्रमामध्ये पुढील सहा महिन्यांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधील 50,000 महिला उद्योजिकांना सामील करण्याचा संकल्प स्थापित केला आहे.
अलुकोअर सादर
अलुकोबॉण्डने ‘अलुकोअर’ची नेक्स्ट जेन श्रेणी सादर केली. ‘अलुकोअर’ हे उत्पादन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक प्रगत व सक्षम केले गेले असून आता ते ‘अलुकोअर हनीकोम्ब पॅनेल्स’ आणि ‘अलुकोअर ए. सी. सी. पी. यामध्ये उपलब्ध आहे.
सिद्धार्थ अकॅडमी
कर्नाटकमधील डिम्ड-टू-बी-युनिव्हर्सिटी श्री सिद्धार्थ अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन (एसएसएएचई)ने आज नेक्स्ट-जनरेशन शैक्षणिक संस्था अपग्रॅड स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीसोबत धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली.
लागोपाठ तीन दिवस घसरल्यानंतर या आठवडय़ाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार सावरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 448 अंकांनी वधारून 84,929 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 151 अंकांनी वाढून 25,966 अंकांवर बंद झाला. हिंदुस्थानातील बाजार सावरण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत. यात अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक आगामी काळात व्याजदरात आणखी कपात करण्याची शक्यता आहे. कमी व्याजदर हे हिंदुस्थानासाठी सकारात्मक बाब मानली जात आहे. यामुळे विदेशी गुंतवणूक वाढते. हिंदुस्थानी रुपया लागोपाठ तिसऱया दिवशी मजबूत राहिला. डॉलरच्या तुलनेत 90.15 रुपयांवर उघडला. रुपया गेल्या तीन दिवसांत एक टक्का मजबूत झाल्याने याचा थेट परिणाम शेअर बाजारावर पडला. विदेशी गुंतवणूकदारांनी सलग दुसऱया दिवशी खरेदीदारी कायम ठेवली.
फ्लेक्सी कॅप फंडने गाठला मोठा टप्पा
फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंडाने आपला 31 वा वर्धापन दिन साजरा करताना दुहेरी यश साजरे केले आहे. या फंडातील संकलित निधीने अर्थात एयूएमने 20,000 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. या फंडाची वाटचाल निफ्टी 500 टीआरआय निदेशांकावर आधारलेली आहे. या फंडाचे व्यवस्थापन जानकिरामन रेंगाराजू, राजसा काकुलावरापू आणि संदीप मानम हे अनुभवी फंड व्यवस्थापक सांभाळत आहेत. योग्य किंमत मूल्याआधारे वृद्धी (ग्रोथ ऍट रिझनेबल प्राइस) हा त्यांचा शिस्तबद्ध गुंतवणूक दृष्टिकोन कामगिरीचा प्रमुख आधारस्तंभ राहिला आहे.
रिलायन्स, बजाजचे शेअर वाढले
एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन ऍण्ड टुब्रो, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये एक टक्का वाढ झाली. तर दुसरीकडे एचसीएल टेक्नोलॉजीच्या शेअर्समध्ये एक टक्का घसरण पाहायला मिळाली. आयसीआयसीआय बँक, टीसीएसमध्येही घसरण झाली.
ऑगस्ट रेमंडचे भारतात पदार्पण
ऑगस्ट रेमंड या स्वतंत्र स्विस घडय़ाळ उत्पादक कंपनीच्या भारतातील पदार्पणाची घोषणा केली. हेलिओस लक्ससोबतच्या विशेष सहकार्याने भारतात अधिकृत प्रवेश करत ऑगस्ट रेमंड 127 वर्षांचा घडय़ाळ निर्मितीचा वारसा सादर करणार आहे. याअंतर्गत ते हाताने तयार केलेली, हाताने जोडलेली आणि प्रत्येक काळाची ओळख असलेले टाइमपीसेस सादर करत आहे. ‘ओरिजिन लुनार’ हे प्रमुख मॉडेल या मालिकेतील पहिले घडय़ाळ असेल. यावेळी ऑगस्टे रेमंडचे मुख्य माहिती अधिकारी सुंदर क्लिंगेनबर्ग आणि टायटन कंपनी लिमिटेडच्या घडय़ाळ विभागाचे उपाध्यक्ष आणि मुख्य विक्री तसेच विपणन अधिकारी, राहुल शुक्ला उपस्थित होते.
‘पॉलिसी असेसमेंट प्लॅटफॉर्म’ लाँच
कव्हरशुअरने आरोग्य विमा कव्हरेजमधील त्रुटींबाबत जनजागृतीसाठी ‘पॉलिसी असेसमेंट प्लॅटफॉर्म’ लाँच केला. हा प्लॅटफॉर्म 30 हून अधिक निकषांच्या आधारे पॉलिसींचे परीक्षण करतो, तसेच आयआरडीए-प्रमाणित विमा तज्ञांचे मार्गदर्शन मिळते. 60 हून अधिक विमा कंपन्यांच्या 1,500 हून अधिक आरोग्य विमा पॉलिसींचे विश्लेषण करून हा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे.
सेल्स फोर्स इंडियाच्या महसुलात वाढ
सेल्सफोर्सने आणखी एक मजबूत वाढ नोंदवली. कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे सादर केलेल्या नियामक फाईलिंगनुसार 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा भारतातील एकूण नोंदवलेला महसूल 47 टक्क्यांनी वाढून 13,384.5 कोटी रुपये इतका झाला आहे. मुंबईसह पाच शहरात सेल्सफोर्सची कर्मचारी संख्या आता 14,000 पेक्षा अधिक झाली आहे.
पैसेसेव्ह क्रेडिट कार्ड
पैसेबाजार आणि येस बँकेने संयुक्तपणे अपग्रेड केलेले येस बँक पैसा बाजार पैसे सेव्ह क्रेडिट कार्ड सादर केले आहे. या कार्डवर जेवण आणि प्रवासाच्या खर्चावर सहा टक्के कॅशबॅक मिळणार असून दरमहा 3,000 पर्यंत लाभ घेता येईल. मर्यादेनंतरही या श्रेणींवर 1 टक्के कॅशबॅक सुरू राहणार आहे. जेवण व प्रवासावर अधिक बचत करणाऱया ग्राहकांसाठी हे कार्ड आकर्षक पर्याय ठरणार आहे.



























































