
‘टीम इंडिया’ने आगामी वर्षी होणाऱ्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेल्या संघातून उपकर्णधार शुभमन गिलला डच्चू दिला. त्याच्या जागी यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशनला आघाडीच्या फळीत संधी देण्यात आली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत 517 धावा करत धुमाकूळ घालणाऱया किशनमुळे ‘टीम इंडिया’ला मधल्या फळीत रिंकू सिंगला सामावून घेता आले आहे. अलीकडील टी-20 मालिकांमध्ये पहिला पसंतीचा यष्टिरक्षक असलेल्या जितेश शर्माच्या नावाचा मात्र विचार होऊ शकला नाही. सूर्यकुमार विश्वचषकात हिंदुस्थानचे नेतृत्व करणार आहे. अक्षर पटेलला 15 सदस्यीय संघाचा उपकर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.




























































