Maharashtra Local Bodies Election Result Live – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुणा सुहास पाटील यांचा विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींची आज मतमोजणी सुरू आहे. जाणून घ्या निकालाचे सर्व अपडेट्स 

  • जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का
  • धरणगाव नगरपालिकेत महाविकास आघाडी प्रणित शहर विकास आघाडीच्या लिलाबाई सुरेश चौधरी २ हजार ४४७ मतांनी विजयी
  • रत्नागिरी शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी, प्रभाग क्र.४ मधून केतन शेट्ये आणि फौजिया मुजावर विजयी झाले.प्रभाग क्र.१५ मधून अमित विलणकर विजयी झाले आहेत
  • कर्जत नगरपालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीन शिलेदार विजयी

  • वार्ड 4 मधून सुवर्णा जोशी 1477 मतांनी , अंजली कडू 1167 मतांनी संतोष पाटील 936 विजयी

  • १२३७ मतांचा लीड घेत मेहकर न.प.मधे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे किशोर गारोळे नगराध्यक्ष पदी विजयी
  • मुरुड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेनेचे चार नगरसेवक विजयी; रुपेश रमेश पाटील, शहर प्रमुख आदेश दांडेकर, श्रद्धा चंद्रकांत अपराध, देवयानी देवेंद्र गुरव विजयी
  • रावसाहेब दानवे यांना मोठा धक्का, भोकरदनमधून राष्ट्रवादीच्या समरीन मिर्झा यांचा विजय

  • रामराजे निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे निंबाळकर यांचा पराभव
  • पालघर नगरपरिषद नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे उत्तम घरत विजयी
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राजेंद्र ठोंबरे नगराध्यक्षपदी विजयी
  • उरण मध्ये 22 जागांपैकी नऊ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असे एकूण दहा जण विजयी
  • उरण च्या महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर पहिल्या फेरीत आघाडीवर
  • सिन्नरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार आघाडीवर.
  • सोलापुरातील दुधनी भागात स्ट्राँग रुमची चावी हरवली त्यामुळे स्ट्राँग रुग उघडण्यासाठी कुलुप तोडण्यात आले आहे.
  • सावंतवाडीत प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेनेचे देवेंद्र टेमकर विजयी
  • अलिबाग मध्ये मशाल पेटली,  प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेनेचे संदिप पालकर व श्वेता पालकर विजयी