
इस्रोची ‘ड्रोग पॅराशूट’ची चाचणी यशस्वी झाली आहे. अवकाशवीर पृथ्वीवर सुरक्षित आणण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे. ‘ड्रोग पॅराशूट’च्या चाचण्या दोन दिवस चंदिगडमधील टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळेच्या युनिटमध्ये घेण्यात आल्या होत्या. क्रू मॉडय़ूलच्या माध्यमातून अवकाशवीरांना पृथ्वीवर आणले जाते. यासाठी विशिष्ट पॅराशूट लागतात. गगननयानच्या मोहिमेत चार प्रकारचे 10 पॅराशूट आहेत. या चाचण्यांमुळे यानाच्या विविध उड्डाण परिस्थितींमध्ये ड्रोग पॅराशूट्सची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता सिद्ध झाली असून मानवी अंतराळ प्रवासातील ही महत्त्वाची बाब आहे.

























































