
सध्या तरी जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा आहे. मात्र लवकरच यात बदल होणार आहे. सौदीचे क्राऊन प्रिन्स बुर्ज खलिफापेक्षाही मोठी इमारत उभी करत आहेत. जेद्दा टॉवर असे या इमारतीचे नाव असेल. त्याची उंची 1000 मीटर म्हणजेच 1 किलोमीटर असेल. 2028पर्यंत हा टॉवर उभा राहील. बुर्ज खलिफाची उंची 828 मीटर आहे. बुर्ज खलिफाचे 163 मजले आहेत. जेद्दा टॉवरचे त्यापेक्षा अधिक मजले असतील. जेद्दा टॉवरच्या कामाला 2025पासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत त्याचे 80 मजले तयार झालेले आहेत. इंजिनियरिंगचा हा अद्भुत नमुना मानला जात आहे.

























































