
खासगी नोकरदार नोकऱया बदलत असतात. प्रत्येक वेळी त्यांचे वेगळे पीएफ खाते उघडले जाते. त्यामुळे अनेक खाती असतात. ही खाती एकाच ‘यूएएन’मध्ये जोडणे आवश्यक आहे.
यूएएन क्रमांक हा एकच असला पाहिजे. सर्व पीएफ खाती विलीन करण्यासाठी ईपीएफओच्या सदस्य पोर्टलवर लॉगिन करावे. त्यात एक सदस्य एक ईपीएफ खाते, पर्याय निवडा.
तेथे नाव, बँक तपशील, मोबाईल क्रमांक इत्यादी जुळते का, ते तपासून घ्या. व्हेरिफिकेशनसाठी सध्याचा किंवा मागील नियोक्ता निवडून हस्तांतरण रिक्वेस्ट करा.
विलीनीकरणासाठी [email protected] या ई-मेल आयडीवर विनंती पाठवता येते. त्यात तुमच्या जुन्या पीएफ खात्यांचा तपशील द्यावा.
हस्तांतरण विनंती सबमिट केल्यानंतर साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये प्रक्रिया पूर्ण होते. एकाच यूएएनमध्ये सर्व निधी जमा झाल्यामुळे भविष्यात फायदा होतो.

























































