
अमेरिकेचे अर्थतज्ञ आणि दिग्गज मार्पेट रणनीतीकार एड यार्डेनी यांनी या दशकाच्या अखेरपर्यंत सोन्याच्या दरात मोठी वाढ होईल, असे म्हटले आहे. 2029 पर्यंत सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात 10 हजार डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज यार्डेनी यांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 4410 डॉलर प्रति औंस आहे. सोन्याचे दर या दशकाच्या शेवटपर्यंत 10000 डॉलर प्रति औंसवर गेल्यास सोने दरातील तेजी 127 टक्के असू शकते. म्हणजेच सोन्याचे दर अडीच पट वाढू शकतात.
हिंदुस्थानी बाजाराचा विचार केल्यास एमसीएक्सवर सोन्याचा दर 135890 रुपये आहेत. 2029 पर्यंत यात 127 टक्क्यांची तेजी आल्यास दर 3.08 लाख रुपये असेल. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्क येथील कॉमेक्सवर सोन्याचा दर 4400 डॉलर प्रति औंस इतका आहे. 22 डिसेंबरला सोन्याचे दर उच्चांकावर पोहोचले होते.
सोन्याचे आजचे दर
सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या दरात 7214 रुपयांची वाढ झाली आहे, तर सोन्याचे दर 1805 रुपयांनी वाढले आहेत. जीएसटीसह एक किलो चांदीचा दर 213776 रुपये झाला आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 137591 रुपये प्रति तोळा झाला आहे. 2025 मध्ये सोन्याचा दर 57884 रुपयांनी वाढले आहेत, तर चांदीचे दर 121533 रुपयांनी वाढले आहेत. 22 कॅरेट सोन्याचा दर 1653 रुपयांनी वाढून 122363 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह याचा दर 126033 रुपये झाला आहे.



























































